संदीप टूले
Daund News : केडगाव : जिल्हांतर्गत सहाव्या टप्प्यामधील शिक्षकांच्या बदल्या संदर्भात दौंड तालुक्यातील शिक्षकांचे एक शिष्टमंडळ दौंडचे आमदार राहुल कुल यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळेस त्यांनी तालुक्यातील अन्यायग्रस्त शिक्षकांच्या बदलीसंदर्भातील मागण्या पावसाळी अधिवेशनात बाजू मांडावी यासाठी एक निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार राहुल कुल यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांना फोन करुन 5 जुलैच्या शासन पत्राप्रमाने त्वरित कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या. त्याचबरोबर झालेल्या बदली प्रक्रियेत पती पत्नी व 53 + च्या सर्व बांधवासाठी सोयीने बदली मिळण्यासाठी स्वतंत्र पत्र काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे राहुल कुल यांनी या शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
यावेळी शिक्षक अशोक कदम यांनी सांगितले की, माझ्यासारख्या बऱ्याच शिक्षकांची बदली ही ६ व्या टप्पात झाली असून, शासन आदेश असल्यामुळे बदली झालेल्या ठिकाणी नाईलाजास्तव आम्हाला पदभार स्वीकारवा लागला. (Daund News) पण काही दिवसातच शासनाने ५ जुलै २०२३ चा आदेश रद्द केला. त्यामुळे आमच्यावर आन्याय न करता आमची बदली रद्द करून पूर्वीच्या ठिकाणी आम्हाला रुजू करून घ्यावे.
रद्द केलेल्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी
सहाव्या टप्प्यातील बदली झालेल्या शिक्षकावर अन्याय होऊ नये यासाठी शासनाने जो रद्द केलेला आदेश आहे, त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करून या शिक्षकांना न्याय द्यावा.
– विकास शेलार,
उपाध्यक्ष, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : धक्कादायक! धावत्या बसमध्ये कंडक्टरवर चाकू हल्ला; प्रवाशाचाही हात फ्रॅक्चर
Daund News : राहू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना आत्तापासूनच स्पर्धा परीक्षांचे धडे