गणेश सूळ
Daund News : दौंड : रयत शिक्षण संस्थेच्या देलवडी (तालुका दौंड) येथील जय मल्हार विद्यालयाचा ९२.१० टक्के निकाल लागला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक सतीशचंद्र पाटील यांनी दिली आहे. या वर्षीच्या दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. (92.10 percent result of Jai Malhar Vidyalaya in Delawadi; The girls won the result)
३५ विद्यार्थी परीक्षेत पास
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता.२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारस ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. (Daund News) विद्यालयातील ३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ३५ विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत.
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले प्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे (कंसात टक्केवारी)
१) अस्मिता दादा मलाव (८४.२०)
२) मुमताज मेहरबक्श गवंडी (८१.२०)
३) साक्षी संदिप ढगे (७८.४०)
दरम्यान, यशस्वी झालेल्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक सतीशचंद्र पाटील यांनी अभिनंदन केले. (Daund News) तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : रावेर तालुका कृषी अधिकारीपदी काळेवाडीचे सुपुत्र भाऊसाहेब वाळके यांची निवड….
Daund News : दौंडचे तहसीलदार दिवटे यांनी घेतला पालखी मार्गाचा आढावा….