अरुण भोई
Daund News : दौंड : दौंड तालुक्यातील राजेगाव येथून चोरट्यांच्या टोळीने जेसीबी मशीनचा ब्रेकर व इतर साहित्याची चोरी केली होती. पुणे ग्रामीण तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडून चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास केला. भिगवण परिसरामध्ये सापळा रचून, आरोपींना शिताफीने अटक केली व त्यांच्याकडून गुन्ह्यातील जेसीबी मशीन, ट्रॅक्टर असा एकूण ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
चौघे अटकेत
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी १८ ऑगस्ट २०२३ रोजी विजय बबन गायकवाड (रा. वडकी, ता. हवेली, पुणे) यांनी दौंड पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. (Daund News) पुणे ग्रामीण तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडून चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात येत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शीळीमकर यांनी यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक केली होती.
दरम्यान, तपास करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून खबर मिळाल्याने या पथकाने २ सप्टेंबर रोजी भिगवण परिसरामध्ये सापळा रचून आरोपींना शिताफीने अटक केली व त्यांच्याकडून गुन्ह्यातील जेसीबी मशीन, ट्रॅक्टर असा एकूण ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. (Daund News) निहाल असलम मुलानी, रोहित दुरांडे, निलेश कुसाळकर व जालिंदर दादा जाधव (सर्व रा. भिगवण) या आरोपींना ताब्यात घेऊन दौंड पोलिसांच्या ताब्यात दिले.
ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शीळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, आसिफ शेख, विजय कांचन, (Daund News) अतुल डेरे तसेच सहायक फौजदार राजपुरे व दौंड पोलीस ठाण्याचे महेंद्र लोहार, सुभाष राऊत, किशोर वाघ यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : काळेवाडी बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्याची ग्रामस्थांची पाटबंधारे विभागाकडे मागणी
Daund News : राजेगाव परिसरात आजही पाण्याची टंचाई; शेतकऱ्यांना प्रतीक्षा फक्त जोरदार पावसाची..!