पुणे : दौंड-हडपसर डेमू रेल्वे सेवा पुणे स्थानकापर्यंत नेण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली होती, या मागणीला अखेर यश आले आहे. दौंड येथून सकाळी 6:10 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 01522 ही लोकल उद्या 05 ऑक्टोबर पासून पुणे स्थानकापर्यंत धावणार आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण रेल्वे प्रवाशी ग्रुपचे कार्यध्यक्ष प्रमोद उबाळे यांनी दिली आहे. त्यामुळे पुण्यातील चाकरमानी, विद्यार्थी, याव्यतिरिक्त, सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
01522 ही लोकल गेल्या 18 महिन्यांपासून हडपसर रेल्वे स्थानकावर थांबत असल्यामुळे प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण आव्हाने निर्माण झाली होती. मात्र, आता या निर्णयामुळे सर्व रेल्वे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, परतीच्या प्रवासासाठी याचे मुख्य स्टेशन हे हडपसरच असणार आहे. तसेच, या गाडीचा वेळ आधीच्या वेळेपेक्षा 5 मिनिटे आधी करण्यात आला असून याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आव्हान देखील प्रमोद उबाळे यांनी केले आहे. तसेच सर्व संघटना, स्थानिक आमदार, खासदार यांचे मनापासून आभार मानले आहेत.