संदीप टूले
Daund | दौंड, (पुणे) : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आमदार राहुल कुल गटाचे गणेश जगदाळे यांची तर उपसभापतीपदी शरद कोळपे यांची निवड झाली आहे.
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाला समान जागा मिळाल्या होत्या. दोन्ही बाजूंनी समान संचालक निवडून आल्याने सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे दौंडसह जिल्याचे लक्ष लागू राहिले होते.
मात्र नुकतेच माजी आमदार रमेश थोरात गटाचे संचालक संपतराव निंबाळकर यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या आकस्मित निधनामुळे राहुल कुल यांच्या गटाचे ९ संचालक व थोरात गटाचे ८ सदस्य असल्याने दौंड बाजार समितीवर आमदार राहुल कुल यांनी सत्ता मिळवली.
दरम्यान, कुल गट (भाजप) – थोरात गट (राष्ट्रवादी) अश्या दोन्ही बाजूंनी सभापती, उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. भाजपाकडून गणेश जगदाळे, शरद कोळपे यांनी तर राष्ट्रवादीकडून (राष्ट्रवादी) शिंदे, मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये कुल गटाचे जगदाळे, कोळपे हे निवडून आले.
दिवंगत संचालक संपतराव निंबाळकर यांना श्रद्धांजली…
दरम्यान, सभापती, उपसभापती पदाची निवडणूक पार पडल्यानंतर दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी प्रभागातील सदस्य संपतराव निंबाळकर यांचे निधन झाल्यामुळे कोणताच जल्लोष न करता दिवंगत संचालक संपतराव निंबाळकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Daund News : संकटावर मात करीत वीरपत्नीने मिळवली पोलिस दलात नोकरी
Daund News : दौंड येथे दहावीच्या मुलीची भीमा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या ; परिसरात हळहळ..