दौंड : Daund Crime – कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबाला जीवे मारण्याचा (Attempt to kill wife of martyr jawan)प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दौंड Daund Crime) येथील संरपंच वस्तीत राहणाऱ्या एका महिलेने दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार मौजे गोपाळवाडी (ता.दौड जि. पुणे) येथील गट नं 52/1/अ मधील जमीनवर हद्दीत ४ मार्चला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला. (Daund Crime) (Daund Crime)
दौंड पोलिस ठाण्यात १२ जणांवर गुन्हा दाखल (A case has been registered against 12 people in Daund police station)
या प्रकरणी 12 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 1) महेश रमेश चोरमले 2) किसन नामदेव चोरमले 3) भिमा नामदेव चोरमले 4) गणेश रमेश चोरमले 5) अमोल उर्फ गोट्या किसन चोरमले 6) सागर किसन चोरमले 7) शुभम उर्फ बंट्या भिमा चोरमले 8) मंगेश भिमा चोरमले 9) प्रिती महेश चोरमले 10) सुनिता किसन चोरमले 11) सुनिता गणेश चोरमले 12) विमल रमेश चोरमले (सर्व रा.गोपाळवाडी ,दौंड) अशी गुन्हा दाखल केलल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कारगिल युध्दातील शहीद झालेल्या जवानाची पत्नी आहे. फिर्यादी महिने अशोक अनंता होले व दादासाहेब रामदास काळे यांच्याकडून प्रत्येकी 20 गुंठे अशी एकुण 40 गुंठे जमीन गट नं 52/1/अ अशी विकत 2017 मध्ये खरेदी केली आहे. ही जमीन गोपाळवाडी ता.दौड जि पुणे येथे आहे. या जमिनीवर त्या दरवर्षी वेगवेगळे प्रकारचे पिके घेत असतात.
दरम्यान, शेतात काम करत असताना ४ मार्च रोजी दुपारी आरोपींनी जमीनीवर येत आरोपी महेश रमेश चोरमले याने महिलेला, आमच्या रानातून निघून जा असे सांगितले. त्यानंतर झालेल्या वादातून आरोपींनी महिलेसह तिच्या मुलाला आणि मुलीला मारहाण केली. या घटनेनंतर फिर्यादी महिला बाहेर गावी निघून गेल्या होत्या. त्या आल्यानंतर त्यांनी फिर्याद नमुद केली. असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.