पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दौंड-अजमेर (२६ फेऱ्या), सोलापूर-अजमेर (१८ फेऱ्या), तर साईनगर शिर्डी-बिकानेर (२६ फेऱ्या) दरम्यान विशेष गाड्यांचा विस्तार केला आहे. या मार्गावर धावणाऱ्या तीनही गाड्यांच्या तब्बल ७० फेऱ्या वाढवल्या आहेत. तसेच या सर्व गाड्यांचा धावण्याचा दिवस, वेळ, रचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
दौंड-अजमेर साप्ताहिक विशेष ट्रेन २० ऑगस्टपर्यंत दर शुक्रवारी अधिसूचित करण्यात आली होती. तिच्या आता ६ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत १३ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. तर, अजमेर-दौंड साप्ताहिक विशेष ट्रेन पूर्वी २९ ऑगस्टपर्यंत दर गुरुवारी अधिसूचित करण्यात आली होती. ती आता ५ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अधिसूचित करून १३ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.
सोलापूर-अजमेर साप्ताहिक विशेष गाडीच्या १८ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. सोलापूर-अजमेर साप्ताहिक स्पेशल गाडी पूर्वी २६ सप्टेंबरपर्यंत दर गुरुवारी अधिसूचित केली होती. आता ३ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ९ फेऱ्या वाढल्या आहेत. तर, अजमेर-सोलापूर साप्ताहिक स्पेशल गाडी प्रत्येक बुधवारी २५ सप्टेंबरपर्यंत अधिसूचित केली होती. या गाडीच्या आता २ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ९ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
साईनगर शिर्डी-बिकानेर- साईनगर शिर्डी स्पेशल गाडीच्या २६ फेऱ्या वाढवल्या आहेत. साईनगर शिर्डी-विकानेर साप्ताहिक विशेष गाडी १ सप्टेंबरपर्यंत दर रविवारी अधिसूचित करण्यात आली होती. या गाडीच्या आता ८ सप्टेंबर ते १ डिसेंबर २०२४ पर्यंत १३ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. तर, बिकानेर-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष गाडी दर शनिवारी ३१ ऑगस्टपर्यंत अधिसूचित केली होती. या गाडीच्या आता ७ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत १३ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.