पुणे : पुणे-राजस्थान मार्गावर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दौंड-अजमेर-दौंड साप्ताहिक विशेष २० गाड्या सोडण्यात येणार आहे. दर शुक्रवारी धावणारी दौंड-अजमेर साप्ताहिक विशेष (ट्रेन क्रमांक ०९६२६) गाडी ५ एप्रिलपर्यंत अधिसूचित करण्यात आली होती. ती आता १२ एप्रिल ते १४ जूनपर्यंत वाढवण्यात आली असून १० फेऱ्या करण्यात येणार आहे. तर दर गुरुवारी धावणारी अजमेर-दौंड साप्ताहिक विशेष (ट्रेन क्रमांक ०९६२५) गाडी ४ एप्रिलपर्यंत अधिसूचित करण्यात आली होती. ती आता ११ एप्रिल ते १३ जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. या गाडीच्या एकून १० फेऱ्या करण्यात येणार आहे.