दिनेश सोनवणे
दौंड : येथे उद्यापासून (दि.१०) दौंड कृषी महोत्सव २०२३ या जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शआचे आयोजन करण्यात येणार असून हे प्रदर्शन १५ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे माहिती, भाजपाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व महोत्सवाचे संयोजक वासुदेव काळे यांनी दिली.
दौंड तालुका कृषी उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात एकूण २ लाख शेतकरी भेट देतील. या वेळी शेतकऱ्यांना केंद्र, व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
या कृषी प्रदर्शनात तालुका कृषी पंचायत समिती विभाग यांचा समावेश असेल. दौंड पाटस रस्त्यावरील रामकृष्ण लॉन्ससमोरील मैदानात सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांमध्ये नवतंत्रज्ञानाची ओळख व्हावी, ही मुख्य संकल्पना आहे. त्याचबरोबर महिला बचत गटाच्या उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. शेतकऱ्यांशी थेट होणारा संवाद या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.