पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. जन्मदात्या बापाने मुलीवर कुऱ्हाडीने डोक्यात हाता-पायावर वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. अक्षदा फकीरा दुपारगुडे असं जखमी मुलीचं नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या मावशीच्या पतीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुलीला उपचारासाठी ससून रुग्णालयात नेले जात होते, पण तिचा मृत्यू झाला. अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जन्मदात्या बापानेच मुलीची हत्या केली. बुधवारी दुपारी वाघोली येथे वडिलांने मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. 15 वर्षीय पोटच्या मुलीला वडिलांनी अतिशय निर्घूणपणे संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत झालेल्या मुलीचं नाव अक्षदा फकीरा दुपारगुडे असून सध्या वाघोली येथे राहतात, ते मूळचे सोलापूर येथील आहेत.