मावळ: क्रीडामंत्री दत्तात्रय भरणेंचा व्हॉलिबॉल खेळताना तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. यावेळी भरणे थोडक्यात बचावलेत. व्हॉलिबॉलच्या लोखंडी पोलवर त्यांचं डोकं आपटण्याची शक्यता होती, मात्र भरणेंनी लोखंडी पोलच्या आधी स्वतःला सावरलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

मावळ तालुक्यतील परंदवडी येथे इंदिरा शिक्षण समुहाच्या कॅम्पसमधील चाणक्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन राज्य क्रीडामंत्री भरणे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २३) संपन्न झाले. यावेळी विविध खेळांचा आनंद क्रीडा मंत्र्यांनी घेतला. यावेळी मंत्री दत्ता भरणे व्हॉलिबॉल खेळण्यासाठी ग्राउंडवर उतरले. सुरुवातीला भरणे यांनी हॉलीबॉल योग्यरित्या टोलवला. पण समोरील बाजूने टोलवलेला हॉलीबॉल नेटच्या पुढं आला अन् त्याचवेळी भरणे यांचा तोल जाऊन ते जमिनीवर पडले. यात त्यांना किरकोळ मुक्का मारही लागला याची कबुली त्यांनी जाहीरपणे दिली. पुन्हा उठून त्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी घडलेल्या घटनेबाबत जो पडतो, तोच सावरतो असे दिलखुलास मतही प्रसिद्धी माध्यमांसमोर दत्ता भरणे यांनी व्यक्त केले.







