पुणे : पुणे टपाल क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व डाक विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, अशी माहिती पुणे ग्रामीण डाक विभागचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांनी दिली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम आझाद मेमोरियल हॉल मध्ये शनिवारी (ता. 1) डाक विभागातील कर्मचारी व त्यांच्या पाल्यांकरिता सांस्कृतिक कार्यक्रम चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुणे ग्रामीण डाक विभागाचे सहाय्यक अधीक्षक एस. डी. मोरे, शिल्पा गोऱ्हे, श्री रतन कुमार, विकास कुचेकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरवात पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आली.
या चाचण्यांमध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यातील डाक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. यावेळी एकांकिका, भरतनाट्यम, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, लोकगीत मोनो ॲक्टिग अशा विविध प्रकारच्या स्पर्धां घेण्यात आल्या. आर पी गोसावी व ओम कुलकर्णी यांनी पेटी व तबला वादन करत स्पर्धकांना साथ दिली. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे ग्रामीण डाक विभागाने केले होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन रेखा गोडघासे यांनी केले व एस डी मोरे यांनी सर्व स्पर्धकांचे व इतर मान्यवरांचे आभार मानले.
लोकांच्या कलेला वाव मिळावा म्हणून पोस्ट ऑफिस मध्ये देखील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धा घेतल्या जातात. यामधून निवड झालेल्या स्पर्धकांना महाराष्ट्र राज्य पातळीवर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पाठविण्यात येणार आहे .
बाळकृष्ण एरंडे (अधीक्षक-पुणे ग्रामीण डाकघर विभाग)