पुणे : पुण्यातील गुन्हेगारी थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कंबर कसली आहे. कारण, आता पुणे पोलीस दलात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या शरद मोहोळ हत्या प्रकरणामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या अनुषंगाने पुणे पोलिसांकडून सतर्कतेची पावले उचलली जात आहेत.
काही दिवसांपूर्वीच पोलिसांकडून अट्टल गुन्हेगारांची परेड काढण्यात आली होती. त्यात, त्यांना गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स सोशल मीडियावर टाकू नका अशा सक्त सुचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर देखील रिल्स सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले. त्यामुळे आता पोलीस आणखी सतर्क झाले आहे. थेट कारवाई करण्यात येत आहेत.
गुन्हेगारीच्या घटना नियंत्रणात आणून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पुणे पोलीस दलात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिटची स्थापना केली जाणार आहे. पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखा आणि सायबर शाखेतील कर्मचाऱ्यांना एकत्रित करून या नव्या युनिटीची स्थापना केली जाणार आहे. या अंतर्गत पुणे पोलिसांकडून प्रत्येक गुन्हेगारावर इंन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवरून वॉच ठेवला जाणार आहे.
प्रत्येक गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढण्यास सुरूवात केली आहे. आत्तापर्यंत 60 सोशल मिडीया अकाऊंटवरून रिल्स व कंटेंट डिलीट करून ते डिअॅक्टीव्ह केले आहेत. 250 हून अधिक इन्स्टाग्राम अकाऊंट आयडेंटीफाय करण्यात आले आहेत. ज्यावर गुन्हेगारांचे रिस्ल अपलोड केले जातात.