(Crime News) पुणे : माजी खासदार निलेश राणे यांना ट्विटरवर अपमानास्पद शिवीगाळ करुन त्यांची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ११ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२३ दरम्यान घडला आहे.
सायबर पोलिसांनी केला गुन्हा दाखल …
योगेश अरुण शिंगटे (वय ३८, रा. डेक्कन) यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार राहुल मगर नावाच्या ट्विटर अकाऊंट चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मगर नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन माजी खासदार निलेश नारायण राणे यांच्या ट्विटर अकाऊंट वर “आर नाल्या तुला तुझ्या आई आणि बायको मधला फरक कळत नाही. तु काय लायकी आहे. तुझ्या बापाला किती किंमत आहे, निल्या किती चालणार” असे ट्विट केले आहे.
तसेच ठाणे येथील एका महिलेच्या ट्विटर अकाऊंटवर अश्लिल भाषा वापरुन ट्विट करुन दोघांना अपमानास्पद शिवीगाळ करुन त्यांची बदनामी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ननवरे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
पुण्यात जी -20 परिषदेला आजपासून सुरुवात ; नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन
Gautami Patil : खर्शी तर्फ कुडाळमध्ये आजीच्या पप्पीने भारावली गौतमी पाटील