( Crime News ) पुणे : ईस्लामिक स्टेट खोरासान प्रांत (आयएसकेपी) प्रकरणाप्ररकणी एनआयएकडून तपास सुरु आहे. त्यानुसार संशयितांशी संबंधित ठिकाणी छापा कारवाईचे सत्र सुरु आहे. दोन संशयितांशी (Crime News) संबंधित चार ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणेने छापेमारी केली. यात पुण्यातील तलहा खान याच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे.
पुण्यासह मध्यप्रदेशमधील सीवोनी येथे अक्रम खान याच्या घरी कारवाई करत शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
दिल्लीतील ओखला, जामिया येथून काश्मिरी जोडपे जहांजैब सामी वानी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग यांना अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हे जोडपे आयएसकेपीशी संलग्न असल्याचे तपासात समोर आले.
तसेच, एनआयएकडून तपास सुरु असलेल्या अन्य एका प्रकरणातील तिहार कारागृहात असलेल्या आरोपी अब्दुल्ला बशीथ याचाही त्यांच्याशी संबंध समोर आला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Hasan Mushrif ED Raid : हसन मुश्रीफांवर तिसऱ्यांदा ईडीची छापेमारी ; तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी
उरूळी कांचन येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्या मातोश्री पानशॉपवर लोणी काळभोर पोलिसांचा छापा