पुणे : महाराष्ट्र बेरोजगार परिषदेमार्फत कर्ज मंजूर करुन देण्याच्या नावाखाली 39 जणांकडून शुल्क म्हणून 15 लाख 78 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. शोधन भावे असं संशयीत आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी लवीना अमोदन मरियन (वय 47, रा. आदर्शनगर सोसायटी, कल्याणीनगर) यांनी येरवडा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार महाराष्ट्र बेरोजगार परिषदेच्या कार्यालयात नोव्हेंबर 2024 ते 1 एप्रिल 2025 दरम्यान घडला आहे. शोधन भावे हा मुंबईत असल्याचे समजल्यावर या कर्ज मंजूरीसाठी पैसे दिलेल्या लोकांनी त्याला पकडून येरवडा पोलिस स्टेशनला आणले. त्यानंतर या प्रकरणामध्ये फसवणूक केल्याबद्दल शोधन भावेसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आशा चौधरी, वैष्णवी कुलकर्णी-पाठक, अनुप सुभेदार, शोधन भावे व राजेश कानभास्कर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.