Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Cow Milk Rate : दूध उत्पादकांना मोठा दिलासा ! दर तीन महिन्यांनी जाहीर होणार दुधाचे खरेदी दर !

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 28 June 2023, 14:37

Cow Milk Rate :  पुणे :  कृष काळामध्ये दूध उत्पादन कमी असते. त्या काळात दुधाच्या उत्पादकांना दुधासाठी रास्त दर मिळतो, परंतु पुष्टकाळात दुधाचे उत्पादन वाढल्याने दुधाचे दर कमी होतात आणि खाजगी व सहकारी दूध संघाकडून शेतकऱ्यांचे दूध कमी प्रमाणात स्वीकारले जाते. यंदा हे दर मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. याची दखल घेत राज्य सरकारने दूध उत्पादकांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहिर केला आहे.(Cow Milk Rate)

कृश काळामध्ये दूध उत्पादन कमी असते.

रयत क्रांती संघटनेसह इतर संघटनाने देखील वेळोवेळी या प्रश्नावर आवाज उठवला होता.. त्याची दखल राज्य सरकारने गांभीर्याने घेतली असून, मंगळवारी यासंदर्भात दूध दर निश्चित करण्यासाठी एक समिती बनवण्यात आली आहे.(Cow Milk Rate) या समितीमध्ये सरकारी प्रतिनिधींसह खाजगी व सहकारी दूध प्रकल्पातील प्रतिनिधींची सुद्धा नियुक्ती करण्यात आली असून, दूध उत्पादकांचे प्रतिनिधी देखील घेण्यात आले आहेत. ही कमिटी दर तीन महिन्यांनी वर्तमान स्थिती लक्षात घेऊन दुधाचे खरेदी दर निश्चित करणार आहे.

राज्यातील दूध दर प्रश्नाबाबत 22 जून रोजी पशुसंवर्धन मंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीनुसार ही समिती गठित करण्यात आली आहे.

 

या समितीचे दूध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त हे अध्यक्ष तर उपायुक्त हे सचिव असतील. यामध्ये महानंदाचे अध्यक्ष, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचा प्रतिनिधी सदस्य असतील. महत्त्वाची गोष्ट अशी की यामध्ये खाजगी दूध संघाच्या प्रतिनिधीमध्ये इंदापुरातील सोनाई दूध संघाचे प्रतिनिधी, चितळे डेअरी भिलवडी व ऊर्जा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या तीन प्रकल्पांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.(Cow Milk Rate)

राज्यातील दूध संकलन हे खाजगी आणि सहकारी दूध संघाकडून केले जात आहे. दुधाच्या कृष काळात दूध उत्पादन कमी असल्याने दुधाच्या भावात वाढ होते परंतु ज्यावेळी दुधाचे उत्पादन वाढते त्या काळात मात्र खाजगी व सहकारी दूध संघाकडून शेतकऱ्यांचे दूध कमी दराने स्वीकारले जाते. त्यामुळे दूध उत्पादन शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो,(Cow Milk Rate) या बाबी लक्षात घेत सहकारी व खाजगी दूध संघाचा चालवण्याचा खर्च आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या दुधाला किमान दूध भाव मिळण्यासाठी व दुधाचे दर निश्चित करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे.

सहकारी दूध संघामध्ये जळगावच्या जिल्हा दूध उत्पादक संघाचा समावेश करण्यात आला आहे. वारणा सहकारी दूध संघाचा समावेश करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा दूध संघाचा समावेश करण्यात आला आहे आणि औरंगाबाद जिल्हा दूध संघाचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व संघांचे प्रतिनिधी व सरकारी प्रतिनिधी दर तीन महिन्यांनी बैठक घेतील व राज्यातील सहकारी व खाजगी दूध संघाकडून जे दूध संकलित होत आहे, त्या दुधाच्या उत्पादक शेतकऱ्यांच्या गाईंना दुधाला ३.५/८.५ या प्रतीस व म्हशीच्या ६.०/९.० या प्रतीच्या दुधास दिला जाणारा किमान दूध दर निश्चित करतील.(Cow Milk Rate)

या दुधाला दूध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त शासनाची मान्यता घेतील आणि हा दूधदर कोणतीही कपात न करता दूध उत्पादकांना देणे हे राज्यातील सहकारी व खाजगी दूध संघांना बंधनकारक राहील. अशा प्रकारचा हा आदेश देण्यात आला आहे राज्याचे दुग्धविकास उपसचिव मि. भा. मराळे यांनी या संदर्भातील आदेश सर्व विभागांना पाठवला आहे. आता या प्रकारच्या समितीने तरी दूध उत्पादकांना न्याय द्यावा अशी दूध उत्पादकांची अपेक्षा आहे.(Cow Milk Rate)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Bhigavan News : हिंदू मुस्लिम एकतेचा अनोखा प्रयोग, पोलिसांच्या आवाहनाला मुस्लिम बांधवांचा 100 टक्के प्रतिसाद, कुर्बानी न करण्याचा निर्णय..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.