पुणे : पुणे वनविभागाने सुमारे 50 लाखाचे कोरलीन रॉक्स ( कोरलीन शेवाळ जलचर वनस्पती) जप्त करून एकास अटक केली आहे. ही कारवाई विमाननगर परिसरातील पीएनजी ज्वेलर्सच्या पाठीमागे असलेल्या बीसिंग्स एक्वैरियम हिंद विजय सहकारी एचएसजी सोसायटीमध्ये सोमवारी (ता. ७) केली आहे. पुणे वनविभागाने केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहेत.
अमलान असीम बिश्वास (रा. जेनेसीस हौसिंग सोसायटी, आळंदी रोड, वडमुखवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे गन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून अनाधिकृतपणे ठेवण्यात आलेले १९७.६७ किलोग्राम वजनाचे कोरलीन रॉक्स व मॅकॉ जातीचे दोन पोपट जप्त करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन आर प्रविण, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक अतुल जैनक, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोरचे वनपरिमंड अधिकारी प्रमोद रासकर, आरागिरणीचे वनपरिमंडळ अधिकारी व्ही जे बाबर, वनरक्षक अंकुश कचरे, अनिल राठोड, काळुराम कड, ओंकार गुंड, प्रिती नागले व वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी वृंद यांच्या पथकाने केली आहे.