शिरूर येथे गणेशोत्सव व ‘ईद ए मिलाद’निमित्त शांतता बैठक
सविंदणे / अमिन मुलाणी : राज्यात अनेक सण साजरे केले जात असताना हिंदू-मुस्लिम बांधवाची ऐकता पाहावयास मिळते. समाज एकत्रित आणण्यासाठी सण-उत्सव आनंदाने साजरे होणे आवश्यक असते. त्यासाठी शांतता व सुव्यवस्था राखून पोलिस खात्याला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांनी केले.
शिरूर येथील तहसिल कार्यालयात गणेशोत्सव व ‘ईद ए मिलाद’निमित्त शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप यादव, नायब तहसिलदार, स्नेहा गिरी गोसावी, शिरूर नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक आयुबभाई सय्यद, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे बेसुलखे, माजी नगराध्यक्ष नसीम खान, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रदिप सोनवणे, इकबालभाई सौदागर, माजी नगरसेवक मुज्जफर कुरेशी, शोभना पांचगे, काँग्रेसच्या प्रियंका बडगर, माजी सरपंच विठ्ठल घावटे, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष राजेंद्र लोळगे, शशीकला काळे, वैशाली गायकवाड, नोटरी रविद्र खांडरे, वर्धमान रूणवाल, राजेंद्र गोपाळे यांच्यासह शासकीय विभागाचे प्रमुख यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक पार पडली.
यावेळी घट्टे म्हणाले की, गणेशोत्सवात अनेक नवीन कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळत असते. गणेशाची विविध रूपे या कलेतून कलाकार सादर करत असतात. समाजातील वंचीत व विकासापासून दूर असणाऱ्यांना सुखाची सावली देणारे उपक्रम काही गणेश मंडळ करत असतात. गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सर्व गणेश भक्तांनी सहकार्य करून वाहतुकीत केलेल्या बदलाची व स्वरूपासंदर्भात सहकार्य करावे.
तसेच सर्व गणेशभक्तांनी जबाबदारीने वागावे. उत्सव काळात कोणत्याही प्रकारचा विसंवाद नसावा. पोलिसांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळासाठी देखावा, सजावट स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्वच्छता, शिस्त, सामाजिक कार्यक्रम, विसर्जन मिरवणुकीतील शिस्त, जातीय सलोखा, शासनाच्या आचार संहितेचे पालन अशा आठ मुद्द्यांच्या आधारे गणेश मंडळासाठी स्पर्धा ठेवण्यात येणार आहे. जातीय सलोखा, बंधुभाव वाढविणारा हा सण आपल्या आयुष्यात आनंद घेऊन येवो.
देखावे जास्त उंचीचे करू नये
पोलिस उपअधीक्षक गवारी म्हणाले की, देखावे जास्त उंचीचे करू नये. सामाजिक व विधायक उपक्रम गणेश मंडळाने राबवावेत. पोलिस निरीक्षक संजय जगताप म्हणाले की, मागील शिरूर शहरात 177 गणेश मंडळे होती. ऑनलाईन परवानगी उत्सवासंदर्भात गणेश मंडळांनी घेतली आहे. शिरूर शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गाची पहाणी करण्यात आली असून, यासंदर्भात असणाऱ्या अडचणी दूर करण्यात येतील. गणेश मंडळांनी वाहतूकीला अडथळा ठरणार नाही. यानुसार मंडप टाकावेत.
यावेळी माजी नगराध्यक्ष नसीम खान, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, मराठा सेवा संघाचे नामदेवराव घावटे, पोपटराव शेलार, बाजीराव येळे, चंद्रकांत धापटे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब आवारी, रविंद्र सानप, भाजपचे विजय नरके, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष अनिल डांगे, मनसेच्या डॉ. वैशाली साखरे, सुदर्शन दरेकर, प्रा. डॉ. इश्वर पवार, प्रा. सतीष धुमाळ यांनी सूचना मांडल्या.