पुणे : ट्रेनी ias खेडकर सोशल मिडीयावर सद्या चर्चेत आहेत. पुणे येथे कार्यरत असलेल्या वादग्रस्त आणि आलिशान लाईफस्टाईलने प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची मंगळवारी वाशिममध्ये बदली करण्यात आली. पूजा आपल्या मनमानी अधिकाराचा गैरवापर केल्याच्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पूजा खेडकर आता 30 जुलै 2025 पर्यंत वाशिममध्ये तिच्या प्रशिक्षणाचा उर्वरित कालावधी पूर्ण करणार आहे. पूजाचा खेडकरचा पुण्यातील कारनामे एकेक करून बाहेर येत येत असतना, आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रेनी असलेल्या पूजा खेडकरला मॉक इंटरव्ह्यूत महाराष्ट्राशी संबंधित दोन साध्या प्रश्नांची उत्तर देता आली नसल्याचे दिसत आहे.
मॉक इंटरव्ह्यूत ‘त्या’ दोन प्रश्नांवर उडाली भंबेरी..
मॉक इंटरव्ह्यूमध्ये बीडमध्ये महिलांच्या गर्भपिशवी का काढाव्या लागत आहेत? आणि महाराष्ट्राचं देशात सर्वाधिक GST कलेक्शन का आहे? या प्रश्नांची पूजाला देता आली नाहीत. बीडच्या प्रश्नाचे उत्तर पूजाला देताच आलं नाही, तर जीएसटीच्या प्रश्नावर अतिशय मोघम उत्तर पूजाने दिल्यानंतर मुलाखतकार सुद्धा आश्चर्यचकित झाल्याचे दिसून येत आहे.
IAS पुजा खेडकर यांचा मॉक इंटरव्ह्यू पहा त्यांना महाराष्ट्राशी संबंधित 2 साध्या प्रश्नांची उत्तर देता आली नाहीत.
1 . बीड मध्ये महिलांच्या गर्भपिशवी का काढाव्या लागत आहेत
2 . महाराष्ट्राचं देशात सर्वाधिक GST कलेक्शन का आहे? @_prashantkadam @ashish_jadhao pic.twitter.com/vQcKZMuS9g
— Ajay (@AjayDhanje) July 10, 2024
कोण आहे पूजा खेडकर?
पूजा खेडकर 2022 बॅचची महाराष्ट्र केडरची IAS अधिकारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिने UPSC परीक्षेत 841 चा ऑल इंडिया रँक (AIR) मिळवली होती. पूजा खेडकरने खासगी ऑडीवर लाल-निळ्या दिव्याची दिवा आणि व्हीआयपी नंबर प्लेट असलेली तिची खासगी ऑडी कार वापरल्याने वाद निर्माण झाला होता. आयएएसमध्ये प्रोबेशनरी अधिकाऱ्यांना नसलेल्या सुविधांचीही मागणी तिने केली.
याबबत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे सादर केलेल्या अहवालानुसार, खेडकर यांनी 3 जून रोजी प्रशिक्षणार्थी म्हणून कामावर रुजू होण्यापूर्वीच तिला स्वतंत्र केबिन, कार, निवासी क्वार्टर आणि शिपाई देण्याची वारंवार मागणी केली होती. तिला सुविधा नाकारल्या गेल्या.
पूजाचे वडिल दिलीप खेडकर यांनी सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांनी सुद्धा प्रशासकीय बळाचा वापर करत प्रशिक्षणार्थी IAS लेकीच्या मागण्या पूर्ण झाल्याची खात्री करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर दबाव आणला.
पूजावर पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाची पाटी काढून टाकल्याचा आरोपही करण्यात आला होता. पूजाला कार्यालय म्हणून अँटी-चेंबर वापरण्याची परवानगी दिली होती.
पूजाने नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बनावट अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रमाणपत्रे कथितपणे सादर केली अशी माहिती समोर येत आहे. तसेच तिने मानसिक आजाराचे प्रमाणपत्रही सादर केल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. एप्रिल 2022 मध्ये, तिला तिच्या अपंगत्व प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), दिल्ली येथे अहवाल देण्यास सांगण्यात आले, परंतु कोविड संसर्गाचा हवाला देऊन तिने तसे केले नाही.