बापू मुळीक / सासवड : पुरंदर तालुक्यातील क्रिकेटसह इतर खेळाडूसाठी स्टेडियम तयार करणे आवश्यक आहे. सध्या शाळा, महाविद्यालय, गावठाण जागा व नगरपालिकेचे पालखीतळ आणि खाजगी जागावर क्रिकेट स्पर्धा सह विविध ठिकाणी खेळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे महानगराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे.
माळुंगे, बालेवाडी, गहूजेच्या धरतीवर जागा गजबजलेली असताना पी.एम.आर.डीत जागा गेल्यामुळे पुरंदर तालुक्यातील खेळासाठी राष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम असणे, आवश्यक आहे.
पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे मैदान झाल्यास जिल्ह्यातील व विविध तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रशिक्षण व आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळामध्ये सहभागी होण्याची व नाव उंचावण्याची संधी मिळू शकेल, असं भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी म्हटले आहे.