बारामती : बारामती शहर व तालुका काँग्रेसने एकमताने काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी उमेदवार दिला जाईल, त्याचा आम्ही मनापासून प्रचार करणार आहे. पुण्यात जिल्हा कार्यालयात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील उमेदवारीसाठी मुलाखती घेण्यात आल्या.
तसेच, बारामतीत पक्षाच्या ध्येय धोरणाविरुद्ध रोहित बनकर यांनी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या बाहेर लावलेल्या बॅनरमुळे पक्षात गैरसमज झाले आहेत. याची चौकशी करून त्यांची पक्षातून हकालपट्टी व्हावी, असा ठराव केल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक इंगुले यांनी सांगितले. बारामती शहर व तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या प्रसंगी शहराध्यक्ष अशोक इंगुले, तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, अॅड. आकाश मोरे, वीरधवल गाडे, सूरज भोसले, योगेश महाडिक उपस्थित होते.