उरुळी कांचन : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील नाकोडा ज्वेलर्सचे मालक संतोषकुमार जैन यांची आई कंचनबाई भुरमलजी पालरेचा (वय-७६) यांचे आज सोमवारी (ता. ६) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात चार मुली, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दरम्यान, कंचनबाई पालरेचा यांचे पार्थिव उरुळी कांचन येथील आश्रम रस्त्यावरील शिवरकर बिल्डिंग येथे त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर उरुळी कांचन येथील स्मशान भूमीत सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.