पुणे : सिंहगड म्हणजे पर्यटकांसाठी आणि ट्रेकर्ससाठी नंदनवनच. निसर्गाचा खरा आनंद घेण्यासाठी प्रत्येकाची वारी ही सिंहगडाकडे असते. अशा किती तरी वाऱ्या करून झालेले 79 वर्ष वयाचे तरुण श्री. विकास करवंदे, यांनी नुकतीच तब्बल 1600 वी सिंहगडवारी पूर्ण केली आहे. तरुणाईला लाजवेल अशी ही
कामगिरी त्यांनी करून दाखवली आहे.
कोण आहेत श्री. विकास करवंदे?
श्री. विकास करवंदे यांनी वयाच्या 53 व्या वर्षी म्हणजेच 5 मार्च 1995 रोजी प्रथम सिंहगडवारीची सुरूवात केली. वयाच्या 79 व्या वर्षापर्यंत 1600 वी सिंहगडवारी पूर्ण केली आहे. हिमालयातील ट्रेक करत असताना आलेला पॅरेलेसिस ॲटक, आणि त्यावरही मोठ्या जिद्दीने मात करत श्री. विकास करवंदे पुढे जात राहिले. गुरूवार दि.13 जून 2024 रोजी त्यांनी आपली 1600 वी सिंहगडवारी पूर्ण केली आहे.
श्री. विकास करवंदे यांनी जिद्दीने स्वतःचे सामर्थ्य शोधले आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वयाच्या 79 व्या वर्षी अशक्य वाटणारी 1600 वी सिंहगडवारी यशस्वीरित्या पूर्ण केली. तरुणाईला लाजवेल अशी ही कामगिरी आहे. श्री. विकास करवंदे यांनी आपली 1600 वी सिंहगडवारी पूर्ण केली आहे त्याबद्दल जुगल किशोर राठी, मास्टरजी सुनिता नाडगीर, अरविंद जगदाळे यांच्या हस्ते श्री. विकास करवंदे यांचा स्मृतीचिन्ह, पगडी आणि मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. श्री. विकास करवंदे यांचा कौतुक व सत्कार समारंभ गुरूवार (दि. 13) रोजी पुणे दरवाजा सिंहगड येथे सिंहगडपरिवाराचे सदस्याचे साक्षीने, सिंहगडावरील आंनदी वातावरणात व शिव गर्जनेसह सत्कार समारंभ संपन्न झाला.