Maharashtra State Electricity Board शिरूर ( पुणे ) : अनेकवेळा वीज पूरवठा खंडित झाल्यास अनेकदा त्याची पूर्वकल्पना ग्राहकांना नसल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. ही गैससोय टाळण्यासाठी तसेच वीज देयक, इतर महत्वाच्या सूचना व माहिती आता ग्राहकांना मोबाईलवरच उपलब्ध होणार आहे.
वीज जाणार असेल तर त्याची पूर्वसूचना ग्राहकांना महावितरण देणार आहे. यासाठी ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणे गरजेचे आहे. ग्राहकांना वीज बिले, वीज जोडणी, डिमांड भरणे, मीटर रीडिंग पाठविणे, वीज बिल पाहणे यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. महावितरणच्या विविध सेवांची माहिती व ग्राहकांना तक्रार निवारणासाठी महावितरणकडून टोल फ्री सेवा असून नोंदणी केलेल्या क्रमांकावरून तक्रारही करता येणार आहे.
मोबाईल क्रमांक कसा नोंदवाल…
ज्या ग्राहकांनी मोबाईलची नोंदणी केली नाही. त्यांनी MREG टाईप करून 9930399309 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा. तसेच www.mahadiscom.in या संकेत स्थळावर अथवा 421830060800 या क्रमांकावर नोंदणी करता येईल.
एसएमएसव्दारे मिळणार सुविधा
महावितरणमध्ये ज्या ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे, अशा नागरिकांना वीज बील येण्याआधी एसएमएसद्वारे वीजबिलाची माहिती मिळत आहे. ज्या ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक महावितरणमध्ये जाऊन नोंदविला आहे, त्यांना संपूर्ण माहिती ही एसएमएस वर देण्यात येत आहे.
मोबाईल एसएमएसची सुविधा प्रत्येक नागरिकांना मिळू लागली आहे. त्यामुळे महावितरण विविध सोयीसुविधांची माहिती देखील ग्राहकांना मोबाईलवर देत आहे. यामध्ये त्यांना त्यांचे वीजबिल तसेच त्यांच्या भागातील खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्याची माहितीही दिली जाते. त्यामुळे ज्या ग्राहकांनी नोंदणी केली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.