लोणी काळभोर : माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेल्या माहितीची मूळ पत्र मागण्यासाठी गेल्यानंतर वडकी (ता. हवेली) ग्रामसेवकांनी अरेरावीची भाषा करून शिवीगाळ केली आहे. असा आरोप एकाने केला असून याप्रकरणी त्यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी अर्ज दाखल केला आहे. जितेंद्र शिवाजी आंबेकर (रा. वडकी, ता. हवेली) यांनी ग्रामसेवक माधव सुखदेव वाघ यांच्या विरोधात तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडकी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 1377 मधील जागेत कोणत्याही प्रकारचे बांधकाम नसताना ही नोंद ग्रामसेवक माधव वाघ यांनी मंजूर केली होती. व नोंद मंजूर झालेल्या व्यक्तीने त्या जागेवरून सुमारे दीड कोटींचे कर्ज मंजूर करून घेतले आहे. या नोंदीमध्ये खूप मोठा भष्टाचार झाला आहे. असा आरोप करून जितेंद्र आंबेकर यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत आपले सरकार केंद्रावरून अर्ज भरून माहिती मागितली होती.
त्यानंतर ग्रामसेवक माधव वाघ यांनी सदर नोंद ही माझ्या कार्यकाळात झालेली नव्हती. अशी माहिती आपले सरकार केंद्रावर पीडीएफ स्वरुपात मिळाली होती. या माहितीची मूळ पत्र घेण्यासाठी जितेंद्र आंबेकर वडकी ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (ता.22) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गेले होते. या ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, जितेंद्र आंबेकर यांनी ग्रामसेवक माधव वाघ सदर माहितीची मूळ प्रत मागितली असता, ग्रामसेवक माधव वाघ यांनी अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ केली आहे. असा आरोप जितेंद्र आंबेकर यांनी केला असून याप्रकरणी त्यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला आहे.
ग्रामसेवक माधव वाघ यांनी खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल तर शासनाची फसवणूक केली आहे. गट नंबर 1377 मधील नोंद ही त्यांच्या कार्यकाळातच झाली आहे. माहिती मागितल्यानंतर माहिती देणे त्यांचे कर्त्यव्य आहे. मात्र माहिती ची मूळ पत्र आणण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी चुकीची भाषाशैली करून शिवीगाळ केली आहे. याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. तसेच गट विकास अधिकारी यांच्याकडेही तक्रार करणार आहे.
-जितेंद्र आंबेकर (तक्रारदार – वडकी ता. हवेली)वडकी ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 1377 मधील नोंद ही माझ्या कार्यकाळात झालेली नाही. माहिती कार्याद्यांतर्गत मागवलेली माहिती त्यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे सदरच्या नोंदी संदर्भात माझा कोणताही हितसंबंध नाही. उलट हेच शासकीय कामात अडथळा आणत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून तक्रारदाराविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल.
-माधव वाघ (ग्राम विकास अधिकारी, वडकी ता. हवेली)