बारामती: बारामती एमआयडीसीमधील समर्थ एंटरप्राईजेस या कंपनीतील स्क्रॅपच्या सामानाला गुरुवार 9 मे रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. एमआयडीसीसह अग्निशमन दलाच्या विविध गाड्या ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होत्या. संध्याकाळी सात वाजेपर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती.
या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी कंपनीच्या मालाचे मोठे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उन्हाच्या तीव्रतेने आग लागली असण्याची शक्यता स्थानिक उद्योजकांनी बोलून दाखवली आहे.