उरुळी कांचन, (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महाराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित सतीश कांचन यांच्या वतीने भव्य रक्तदान व अवयवदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
येथील जिजाऊ सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ११८ नागरिकांनी रक्तदान केले. यामध्ये ३० महिलांचा समावेश होता. तर २२० नागरिकांनी अवयवदानासाठी नोंदणी केल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित कांचन यांनी दिली.
यावेळी ज्येष्ठ नेते व महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष के डी बापू कांचन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण काळभोर, भाजपा जिल्हा समन्वयक सुदर्शन चौधरी, क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, पूनम चौधरी, उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, दत्तात्रय कांचन, अश्विनी कांचन, संचिता कांचन, सुप्रिया गोते, सीमा कांचन, भारतीय जनता पार्टी उरुळी कांचनचे विकास जगताप, अक्षय कांचन, आबा चव्हाण, पूजा सणस, रेखा तुपे, सारिका लोनारी, कविता खेड़ेकर, खुशाल कुंजीर, ऋषिकेश शेळके, आशुतोष तुपे, गणेश घाडगे, ऋषिकेश ढवळे, मानसी भुजबळ खुशी कुंजीर आरती मोडक साक्षी ढवळे आदी उपस्थित होते.