अजित जगताप
वडूज : आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचा १९१ व्या स्मृतीदिन खटाव तालुक्यात साजरा करण्यात आला. यावेळी क्रांतीवीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच पुष्पहार अर्पण करण्यात आला.
अशा आध्य क्रांतिकारक वीर उमाजी नाईक यांच्या स्मूर्ती दिनानिमित्त आज वडूज नगरीत जय मल्हार पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र तसेच रिपब्लिकन पक्षाचे वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी वडूज नगरीचे नगरसेवक बनाजी पाटोळे, शशिकांत पाटोळे, बाळासाहेब पाटोळे,विजय पाटोळे, उमेश पाटोळे, सचिन मदने, खटाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उदयसिंह साळुंखे,सहाय्यक अधिकारी श्रीकांत गोसावी,रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष योगेश हिरवे, जेष्ठ पत्रकार अजित जगताप,रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल गडांकुश, भारतीय बौद्ध महासभेचे सुधाकर शिलवंत, संतोष भंडारे, मयुर बनसोडे, सचिन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
आज दिवसभर सातारा जिल्ह्यात विविध गावात राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे दिपक बोडरे, शुभम गुजले, लक्ष्मण पाटोळे, तुषार मंडले, सविता मदने, अशोक मदने, काका जाधव, भारती मदने, लक्ष्मी जाधव व विविध संस्थांनी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी पूजन केले.
दरम्यान, राज्य सरकारने युगपुरुष व युगप्रवर्तक यांच्या यादीत आदरणीय क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा समावेश केल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात आले.