Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्ह्यात नवभारत साक्षरता कार्यक्रम प्रभावीपणे राबवून उद्दिष्ट पूर्ण करावे; जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांचे निर्देश

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Friday, 22 December 2023, 18:45

राहुलकुमार अवचट
पुणे  : देशात निरक्षरता ही एक प्रमुख सामाजिक समस्या असून तिच्या समूळ उच्चाटनासाठी १५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील निरक्षर व्यक्तींसाठी केंद्रस्तरीय नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवून नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय नियामक परिषद रचना समितीच्या बैठकीत डॉ. देशमुख बोलत होते. डॉ .देशमुख म्हणाले, राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी प्रत्येक गावात असाक्षरांचे वर्ग तात्काळ सूरू करावेत. याकामी सर्व विभागांनी सहकार्य करावे. दुर्लक्ष करणारे शिक्षक व अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी.

तालुकास्तरावर तहसीलदार, गट विकास अधिकारी व गट शिक्षणअधिकारी यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रमात प्राधान्याने लक्ष घालून राज्यात जिल्ह्याची कामगिरी चांगली होईल, यादृष्टीने नियोजन करावे. शिक्षण संघटनांनी या कार्यक्रमावरील टाकलेला बहिष्कार तात्काळ मागे घेऊन कार्यक्रमात सहभागी व्हावे. तसेच जिल्ह्याला शंभर टक्के साक्षर करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहनही डॉ .देशमुख यांनी यावेळी केले.

 

यावेळी नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे सदस्य सचिव कमलाकर म्हेत्रे म्हणाले, नवभारत साक्षरता कार्यक्राच्या ‘उल्लास’ ॲपमध्ये निरक्षर व्यक्ती, स्वयंसेवक व्यक्ती व सर्वेक्षक यांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात वय वर्षे १५ वरील एकूण निरक्षर व्यक्ती १० लाख ६७ हजार ८२३ आहेत. पैकी २०२२-२३ या दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यासाठी एकूण ६३ हजार ९५० निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, ५२५ व्यक्तींना साक्षर केल्याची नोंद उल्लास ॲपवर झाली आहे, असेही म्हेत्रे यांनी सांगितले.

यावेळी जि.प. शिक्षणाधिकारी (योजना) तथा नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे सदस्य सचिव कमलाकर म्हेत्रे, नवभारत साक्षरता कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक नामदेव गवळी, शासकीय तंत्रनिकेतनचे विभाग प्रमुख वि. ग. तांबे, शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरवणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता एन.पी. शेंडकर आदी उपस्थित होते.

 

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35

वन विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले! 109 कोटी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश, CBI करणार कसून तपास….

Friday, 3 July 2026, 14:30
Next Post

आयुष्मान भारत गोल्डन कार्ड नोंदणी प्रक्रिया वेगाने राबवावी : डॉ. ओमप्रकाश शेटे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.