Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आयुष्मान भारत गोल्डन कार्ड नोंदणी प्रक्रिया वेगाने राबवावी : डॉ. ओमप्रकाश शेटे

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Friday, 22 December 2023, 19:12

राहुलकुमार अवचट

पुणे  : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत राज्यातील एकही पात्र लाभार्थी आरोग्य उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत इतर संबंधित शासकीय यंत्रणांनी गोल्डन कार्ड नोंदणी व प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरण प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबवावी. या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांच्या होईल यादृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विकसित भारत संकल्प यात्रा २०२३ अंतर्गत आयुष्मान भारत, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभुत सुविधांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

 

मंगळवारपासून गोल्डन कार्डसाठी पॅनलवरील रुग्णालयात विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई , क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. अमोल मस्के, आयुष्मान भारत योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. प्रिती लोखंडे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. शेटे म्हणाले की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरात गरजू लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना गोल्डन कार्ड वितरीत करून देण्याबाबत मोहीम सुरू आहे. याद्वारे रुग्णांना त्यांच्या जवळच्या रुग्णालयात आरोग्य उपचारांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. योजनेचा लाभ रुग्णांना देण्यासाठी त्यांना गोल्डन कार्ड देणे आवश्यक असल्याने कार्ड नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करावेत. हे कार्ड लाभार्थ्यांना दिल्याशिवाय योजनेचा लाभ त्याला देता येणार नाही.

गोल्डन कार्ड नोंदणी आणि वितरणासाठी विशेष नियोजन करावे. महापालिका क्षेत्रात कार्डची नोंदणी कमी असल्याने महापालिकेने गोल्डन कार्डची संख्या वाढविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, या कामाचा दैनंदिन आढावा घ्यावा. धार्मिकस्थळाच्या ठिकाणी मोहिमेसाठी देवस्थान व्यवस्थापनाची मदत घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले. तर जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी करून घेण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. संबंधित यंत्रणांनी या कामाला विशेष प्राधान्य द्यावे.

सीएसई केंद्रांनी या योजनेच्या कामांच्या प्रगतीबाबत दररोजचा अहवाल सादर करावा आणि गोल्डन कार्ड नोंदणीच्या कामाला गती द्यावी. पॅनलवरील रुग्णालयांनी गोल्डन कार्ड काढण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून द्यावी. अधिकाधिक लोकसहभाग घेतांना चांगले काम करणाऱ्या गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांचा प्रत्येक आठवड्यात सन्मान करावा. चांगले काम करणाऱ्या गावांना जिल्हा परिषदेमार्फत पुरस्कार घोषित करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

प्रारंभी आयुष्मान भारत योजनेच्या डॉ.लोखंडे यांनी या योजनेअंतर्गत जिल्ह्यात केलेल्या कामाची माहिती सादर केली. पुणे जिल्ह्यात आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ३८ लाख ५४ हजार लाभार्थ्यांपैकी ९ लाख ५ हजार लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड वितरित करण्यात आले आहेत.

गेल्या महिन्याभरात मोहीम स्तरावर १ लाख ६४ हजार कार्ड वितरित करण्यात आले. विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे या मोहिमेला वेग देण्यात आला आहे, अशी माहिती डॉ.लोखंडे यांनी दिली. या बैठकीस आरोग्य विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक 157; पुणे, नवी मुंबईची हवेची गुणवत्ता निर्देशांक चिंताजनक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.