पुणे : राज्यात बहुतांश जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे. बहुतांश भाग थंडीने गारठला असून, गुरुवारी राज्यात सर्वात कमी तापमान पुणे येथे ८.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले आहे. दरम्यान, थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर भारतातून राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत.
विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटकपासून विदर्भ ते छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत किमान तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
- पुणे – ८.६
- जळगाव – ९.३
- कोल्हापूर – १५
- महाबळेश्वर – ११
- मालेगाव – ९.४
- नाशिक – ८.६
- सांगली – १३.८
- सातारा ११.३
- सोलापूर – १४.८
- धाराशीव – १३.४
- छत्रपती संभाजीनगर – ९.४
- परभणी – १०.९
- नांदेड – १३.८