पुणे : कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) च्या दरात ९० पैशांनी प्रति किलोग्राममागे वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता पिंपरी- चिंचवड आणि चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या लगतच्या भागांसह पुणे शहरात सुधारित किंमत ८५ रुपये ९० पैशांनी प्रति किलोग्राम अशी सोमवारी मध्य रात्रीपासून लागू करण्यात आली आहे.
सीएनजी विभागाच्या वाढत्या प्रमाणामुळे आणि बाजारातील किमतीच्या/आयात केलेल्या नैसर्गिक वायूचे अधिक प्रमाणात मिश्रण करण्याची गरज वाढली आहे. त्यामुळे, इनपुट गॅसची किंमत वाढली आहे.