पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौ-यावर राहणार असून पूरग्रस्त भागांचा पाहणी करणार आहेत. जुनी सांगवी येथील मनपा शाळेपासून दुपारी 12.45 च्या सुमारास दौ-याला सुरुवात करणार आहेत.
आज सोमवारी दुपारी दौ-याला सुरुवात केल्यानंतर ते घोले रोड, शिवाजी नगर, वाकडेवाडी, एकता नगर परिसरातील पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. दुपारी 1.45 च्या सुमारास शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी संवाद साधणार आहे.
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर वाढला आणि धो-धो पावसाने नदीला पूर आला, त्यामुळे नागरिकांचा पुन्हा स्थलांतरीत करण्याची वेळ आली. सध्या पुण्यात लष्कराच्या दोन तुकड्या तैनात असून एक तुकडी स्टँडबायवर आहे. याशिवाय पीएमसी, फायर ब्रिगेड, एसडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे पुण्यात अनेक भागात नुकसान झाले आहे. याभागातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे पुण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांशी मुख्यमंत्री संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.