केडगाव / संदीप टूले : काही दिवसांपूर्वी अमेरिकेने भारताला बनावट औषधांच्या वाढत्या समस्येबद्दल इशारा दिला होता आणि दावाही केला होता की भारतीय बाजारात विकल्या जाणार्या सर्व औषधी वस्तूंपैकी २० टक्के बनावट आहेत. तेव्हापासून भारत सरकार बनावट औषधांची विक्री रोखण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. पण याची पाळेमुळे खोलवर गेल्यामुळे ही बनावट औषधे आता खेडेगावापर्यंत पोहचू लागली आहे. याचे मुख्य कारण की याची असणारी किंमत आहे.
बनावट औषधे ऑनलाईन साखळीमार्फत काही एजंट लोकांना जास्त कमिशनचे आमिष दाखवून काही मेडिकलपर्यंत पोहचली जात आहे व हे काही मेडिकलवाले लोकांना स्वस्त औषधांच्या नावाखाली ही बनावट औषधे खपवत आहेत. भरमसाठ नफ्यासाठी नागरिकाच्या जीवाशी खेळत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी जागृत होऊन आपल्या जवळच्या व विश्वासू मेडिकलमधूनच औषधे खरेदी करणे गरजेचे आहे.
कोणत्याही कमी किमतीच्या बनावट औषधाला घेऊन स्वतःचे आरोग्य धोक्यात घालू नये कारण ही औषधे केवळ लोकांसाठीच नव्हे तर जीवनासाठी घातक घटक देखील बनू शकतात. काही फसव्या संस्था चुकीच्या घटकांपासून औषधांच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या आहेत, ज्यामुळे अशी औषधे तयार केली जातात जी केवळ प्रभावी होणार नाहीत तर मृत्यू देखील ओढावू शकतो. कारण ही औषधे तयार करताना कोणतीही काळजी घेतली जात नाही.
तसेच औषधांची कोणतीही गुणवत्ता तपासली जात नाही. त्यामुळे या औषधांचा उत्पादित खर्च कमी असून, म्हणून ही बनावट औषधे कमी किमतीत पुढे वितरीत केली जात आहे. परंतु या कामासाठी संस्थांना मिळणारा नफा खूप जास्त आहे, त्यामुळे बेकायदेशीर औषधे बाजारात येत आहे.
नागरिकांनी सवलतीला बळी पडू नये
नागरिकांनी कोणतेही औषधे खरेदी करताना विश्वासू मेडिकलमधूनच खरेदी करावे कमी किमतीला सवलतीला बळी पडू नये. कारण कोणत्याही औषधमागे सरकारी नियमानुसार १५ ते २० टक्के मार्जिन आहे. पण काही मेडिकलमधून ग्राहकांना 30 ते 40 टक्के सवलत मिळत असेल तर ग्राहकानी हे औषध नक्कीच तपासून घ्यावे.
– समीर पठाण, भारत मेडिकल, केडगाव
औषध अधिकृत डिलरकडूनच खरेदी करावी
केमिस्ट बांधवांनीही कोणत्याही कंपनीचे औषध अधिकृत डिलरकडूनच खरेदी करावे. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडून किंवा कंपनीकडून थोड्याफार सवलतीसाठी रुग्णाचे जीव धोक्यात घालू नये.
– रोहिदास राजपुरे, CAPD सदस्य.