पिंपरी : पुण्यातील गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्यची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे घडली. सचिन विष्णू माने (वय-४८, रा. आदित्य अपार्टमेंट, स्पाईन रोड, मोशी) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन माने हे सीआयडी पुणे येथे चालक म्हणून कार्यरत होते. ते वडिलांना त्यांच्या बहिणीच्या घरी सोडण्यासाठी गेले होते. वडिलांना बहिणीच्या घरी सोडून परत त्यांच्या मोशी येथील घरी दुचाकीवरून येत असताना.
पिंपळे सौदागर येथील पिके चौकाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या तोंडाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर जखमी सचिन माने यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सचिन माने हे सन 2003 मध्ये पोलीस दलात भरती झाले होते. पुणे शहर पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागात नियुक्तीस होते. सध्या ते पुणे एमटी तर्फे सीआयडी पुणे येथे कार्यरत होते.