पुणे : वाल्मिक कराड याने पुण्यामध्ये बेनामी संपत्ती जमवल्याचा सीआयडीला संशय आहे. पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेज रोडवरील एका एका इमारतीत दोन ऑफिस कराड यांच्याशी संबंधित असलेल्या महिलेच्या नावावर असल्याचे समोर आले होते. यासंदर्भात सीआयडीकडून चौकशी करण्यात येत आहे.
त्याच अनुषंगाने पुण्यातील एका भाजपच्या माजी नगरसेवकाची चौकशी सीआयडीने केली आहे. वाल्मिक कराडप्रक्रणी पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. वाल्मिक कराडची दुसरी पत्नी हिच्या नावे पुण्यात जागा खरेदी करण्यात आली. या खरेदीमध्ये खाडेंनी मध्यस्थी केल्याचा संशय सीआयडीला आहे. हा संशय असल्याच्या पार्श्वभूमीवर दत्ता खाडे यांची सीआयडीने चौकशी केल्याचे बोलले जात आहे.