प्रिया बंडगर
लोणी काळभोर : लोणी काळभोर ( ता. हवेली) येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या ‘इंग्लिश मीडियम स्कूल’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शनिवारी (ता.२४) ‘मेरी ख्रिसमस’ म्हणत एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
शाळेतील काही विद्यार्थ्यांनी ‘सांताक्लॉज’ची वेशभूषा परिधान केली होती. शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नाताळ सणाच्या निमित्ताने उपक्रमाचे आयोजन केले होते. यात विद्यार्थ्यांनी ख्रिसमस ट्रीचे आकर्षक चित्रे रेखाटली होती. काही विद्यर्थ्यांनी कागदापासून ख्रिसमस ट्री आणि टोप्या तयार केल्या होत्या. यावेळी विद्यार्थ्यांनी झिंगल बेलचे गाणे म्हणून आनंद साजरा केला.
दरम्यान, नाताळ सेलिब्रेशनमध्ये विद्यालयातील नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी भाषणे केली. चित्रकला शिक्षक सैफुल शेख यांनी सजावट करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. तर या कार्यक्रमासाठी पृथ्वीराज कपूर मेमोरियल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सीताराम गवळी यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.
यावेळी स्कूलच्या प्राचार्या पोर्णिमा शेवाळे, निरीक्षक विद्यावती शिंदे, प्री प्रायमरी इनचार्ज सुलताना इनामदार, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका पवार व महिमा वाघमारे यांनी केले. तर आभार पूनम साबळे यांनी मानले.