पुणे : पुण्यातील खराडी परिसरातून एक नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या बापानेच साडेचार वर्षांच्या मुलीशी गैरवर्तणूक करून तिचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून नराधम बापाला अटक केली आहे. ही घटना खराडी परिसरात सहा जानेवारीपूर्वी आठ ते दहा दिवस आधी घडली. या प्रकरणी पीडितेच्या ३४ वर्षीय आईने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी पती – पत्नी असून, त्यांना साडेचार वर्षांची मुलगी आहे. आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्यासोबत गैरवर्तन केले. पीडित मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मुळुक करत आहेत.