लोणी काळभोर, ता.26 : छत्रपती श्री संभाजी महाराज पायी पालखी सोहळा गुरुवार दि. 27 मार्च रोजी प्रथमच लोणी काळभोर या ठिकाणी मुक्कामी येणार आहे. त्या संदर्भात लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामस्थांच्यावतीने पालखीच्या स्वागताची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
गुरुवारी सायंकाळी 5 वाजता शिवम रुग्णालयाजवळ पालखीचे स्वागत लोणी काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येणार आहे. तेथून सोलापूर महामार्ग मार्गे कदमवाकवस्ती व नंतर लोणी काळभोर गावात जाणार आहे. लोणी काळभोरमध्ये ग्राम प्रदक्षिणा करून सायंकाळी 7 वाजता श्रीमंत अंबरनाथ मंदिर येथे पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे.
ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ मंदिरात रात्री 8 वाजता हभप बांगर महाराज यांचे प्रवचन होणार असून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. 28 मार्च) सकाळी साडे सात वाजता पालखी प्रस्थान करून थेऊर मार्गे पुढे लोणीकंद मुक्कामी जाणार आहे. परिसरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.