हडपसर : हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार योगेश टिळेकर आणि शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी एकजूट करून प्रचाराचा धुराळा उडवला आहे. हडपसरमध्ये महायुतीच्या एकजुटीमुळे चेतन तुपे यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा मतदारसंघात पसरली आहे.
आमदार चेतन तुपे यांनी आज महंमदवाडी, कृष्णा नगर, हेवन पार्क ते श्रीराम चौक या भागांमध्ये शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या समवेत पदयात्रा केली. या सर्व भागात प्रचारादरम्यान उत्स्फूर्तपणे महिलांनी उमेदवार चेतन तुपे यांचे औक्षण करून त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला आहे. पदयात्रेचे मतदारसंघात उत्साहात स्वागत करण्यात आले. मतदार संघात जागोजागी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाच्या घोषणा दिल्या. प्रचाराच्या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत प्रचार सुरू केला आहे. श्रीराम चौक या ठिकाणी भारतातील पहिल्या भव्य श्रीराम शिल्पास या वेळी चेतन तुपे यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतले.
भारतीय जनता पार्टीचे हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, शिवसेना मतदार संघ प्रमुख अभिमन्यू भानगिरे, अभिजीत बोराटे, सविता घुले, मनोज घुले, कलेश्वर घुले, सुरेश घुले, संजय लोणकर, आदी प्रमुख कार्यकर्ते या वेळी सहभागी झाले होते.
विजयाच्या उमेदवाराकडे कार्यकर्त्यांचा कल…..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे यांनी प्रचार दरम्यान सांगितले की, चेतन तुपे हे आमचे महायुतीचे हक्काचे उमेदवार आहेत. त्यांचा विजय नक्की आहे. शिवसेना आणि भाजप त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे विरोधकांनी केवळ आपल्या कार्यकर्त्यावर लक्ष द्या, एक एक कार्यकर्ता महाविकास आघाडी तून बाहेर पडत आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते दिवस रात्र उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मोठ्या मताधिक्याने चेतन तुपे यांना निवडून आणू, असा माझा शब्द आहे.