हडपसर : गेली पाच वर्षे सर्वसामान्य जनतेसाठी आमदार चेतन तुपे हे नेहमीच उपलब्ध राहिले आहेत. येणाऱ्या प्रत्येकाचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. हडपसरचा सर्वांगीण विकास हेच त्यांचे नेहमी ध्येय आहे. म्हणूनच हडपसरची जनता त्यांच्या पाठीशी आहे. जनतेच्या पाठिंब्यानेच चेतन तुपे यांचा विजय निश्चित आहे, असे मत माजी महापौर वैशाली बनकर यांनी केले. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतन तुपे यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत त्या बोलत होत्या.
“हडपसरच्या विकासाची वाटचाल अधिक गतिमान करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या भागाचा भूमिपुत्र, इथल्या मातीशी एकरूप झालेला हक्काचा माणूस म्हणून मी सदैव तत्पर आहे. आजवर तुमच्या न्याय हक्काचे प्रश्न मी रोखठोक भूमिका घेत विधिमंडळात मांडले आहेत. तुमच्या प्रतिसादातून मला त्याची पोचपावती मिळत आहे. २० नोव्हेंबर रोजी माझ्या हडपसरची जनता अनुक्रमांक १ वरील माझ्या घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून मला पुन्हा एकदा विकासात्मक कामांसाठी निवडतील.” असा विश्वास उमेदवार चेतन तुपे यांनी यावेळी व्यक्त केला.
हडपसर गाव, मगरपट्टा, गाडीतळ, उन्नती नगर, सातववाडी, गोंधळेनगर या भागातून ही पदयात्रा व दुचाकी यात्रा झाली. यावेळी पुणे महानगर पालिकेच्या माजी महापौर वैशालीताई बनकर, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, माजी नगरसेविका उज्वलाताई जंगले, माजी नगरसेविका विजयाताई कापरे, नलिनीताई मोरे, सुनील बनकर, सोमनाथ तुपे, विजय मोरे, डॉ. शंतनू जगदाळे, अभिमन्यू भानगिरे, नितीन होले, सागर राजे भोसले, कलेश्वर घुले, योगेश सूर्यवंशी, विठ्ठल विचारे, सतीश शिंदे, दत्ता जगताप, सतीश भिसे, शालिनी जगताप, अश्विनी वाघ, रोहिणी क्षीरसागर, स्नेहल कांबळे यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.