हडपसर : आपल्या हक्काच्या माणसाकडे आपले गाऱ्हाणे मांडताना लोकांना आपलेपणा जाणवत असतो. तो आपले प्रश्न सोडविणार याची त्यांना खात्री असते. मागील पाच वर्षात त्यांची आपल्या या भूमिपुत्राबाबतचा हा विश्वास अधिक दृढ झाला आहे. म्हणूनच हडपसरची जनता माझ्यासोबत आहे, असे प्रतिपादन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतन तुपे यांनी केले.
येथे प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. “लोकांचा दिवसेंदिवस पदयात्रेला वाढता प्रतिसाद पाहता माझी ऊर्जा वाढते आहे. हडपसरचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी नक्कीच ते 1 घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून मला विजयी करतील.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माऊंट कॉर्मल स्कूल, सिग्नेचर हॉटेल, समता नगर, कुबेरा पार्क, ब्रह्मा होरायजन, कमेला, साळुंखे विहार चौक, लोणकर गार्डन, सिद्धार्थ नगर, NIBM रोड, सर्वज्ञ कॉर्नर, कौसरबाग मस्जिद, लाईफ लाईन दवाखाना रोड, भीम नगर, ज्योती चौक, ज्योती हॉटेल चौक, शिवनेरी नगर, साईबाबा मंदिर, पत्रा चाळ, पूजा मंगल कार्यालय, दगडी वाडा, विठ्ठल मंदिर, हनुमान मंदिर, किराड वखार, गल्ली क्र 12, भगवा चौक, टेंगळे दवाखाना, गल्ली क्र 9 ते 3, अष्टविनायक चौक, भाग्योदय नगर, सन्मित्र बँक, भैरवनाथ मंदिर, पारगे चौक, भैरवनाथ तालीम मेन रोड, नवशक्ती मंडळ, मारुती मंदिर मेन रोड, न्यू डॉन शाळा, वेताळ चौक, समाज मंदिर या भागात ही पदयात्रा संपन्न झाली. यावेळी तुपे यांनी जनतेशी थेट संवाद साधला.
पदयात्रेसाठी पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका नंदा लोणकर, हसीना भाभी इनामदार, नारायण लोणकर, राकेश कामठे, संजय लोणकर, सतपाल पारगे, दादा लोणकर, श्रीकांत लोणकर, अमर गव्हाणे, भाऊ गव्हाणे, संदीप बधे, अमर तुपे, राहुल लोणकर, प्रवीण जगताप, राजू आडागळे, अक्षय शिंदे, ओंकार लोणकर, बापूसाहेब मुलाणी, नुर भाभी शेख, जोऐब काझी, विद्या लोणकर, प्राजक्ता पेठकर यांच्यासह महायुतीच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.