पुणे : पुणे शहरातील श्री चतु: श्रुंगी देवीचे मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद असणार आहे. अशी माहिती देवस्थानने दिली आहे. ऐन श्रावण महिन्यात मंदिर बंद असल्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आले आहे. देवस्थानने पत्राद्वारे कळवले आहे कि, श्री चतु: श्रुंगी देवीचे मंदिर जीर्णोद्धार झाल्याच्या कारणामुळे मंदिराच्या कामासाठी १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीसाठी भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे.
मात्र, देवीची उत्सव मूर्ती हि या एक महिन्याच्या कालावधीसाठी पायथ्याला असलेल्या गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. भाविकांनी या कामासाठी देवस्थानला सहकार्य करण्याचे, आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
नवरात्रात चतु: श्रुंगी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहाने नवरात्रोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो. राज्यभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनसाठी येतात. आता मंदिराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिर एक महिना दर्शनासाठी बंद राहणार आहे. अशी माहिती देवस्थानच्या वतीने भाविकांना देण्यात आली आहे. श्रावणात देवीचे दर्शन घेता यावे यासाठी भाविकांसाठी पर्यायी व्यवस्था केली आहे.
देवीची उत्सव मूर्ती या एक महिन्यासाठी पायथ्याला असलेल्या गणपती मंदिरात दर्शनाला उपलब्ध करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या वेळी अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा या ठिकाणी होत असतात. दररोज सकाळी 10 आणि रात्री 8 वाजता महाआरती करण्यात येते. नवरात्रीत मंदिर 24 तास भाविकांसाठी दर्शनासाठी खुले केले जाते. पोलीस यंत्रणा, खासगी सुरक्षा रक्षक, मंदिरात बंदुकधारी सुरक्षा रक्षक यांची व्यवस्था करण्यात येते.