अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : अनोळखी व्यक्तीसोबत चॅटिंग केल्याने आई रागावली. याचाच राग मनात धरून अल्पवयीन मुलगी घर सोडून निघून गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलीच्या आईने शिरुर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. ही घटना शिरूर शहरातील बागवाननगर येथे २० जुलै रोजी संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मुलीची आई आणि त्यांची अल्पवयीन मुलगी या दोघीच बागवाननगर येथे असलेल्या त्यांच्या घरात राहतात. घरात असताना अल्पवयीन मुलगी अनोळखी व्यक्तीसोबत इन्स्टाग्रामवर चॅटींग करत होती. ही बाब तिच्या आईच्या निदर्शनास आली. त्यावरून आई तिच्यावर रागावली.
त्यामुळे मुलीने घरातून कोणाला काही न सांगता रागाच्या भरात घराच्या दरवाजाची कडी लावून घरातून निघून गेली. मात्र, तिच्या अज्ञात पणाचा कोणीतरी गैर फायदा घेऊन आईच्या कायदेशीर रखवालेतून फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस करत आहे.