Chatrapati Sambhaji Maharaj | लोणी काळभोर, (पुणे) : छत्रपती संभाजी महाराज (Chatrapati Sambhaji Maharaj) यांचा पालखी सोहळा किल्ले पुरंदर ते श्रीक्षेत्र तुळापूर, वढू बुद्रूक २० व २१ मार्च रोजी होणार आहे. यामध्ये सरदार घराण्यांमधील २० स्वराज्यध्वजधारक सहभागी होणार असल्याची माहिती छत्रपती संभाजी महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली. पालखी रथाला भानुदास खांदवे यांच्या बैलजोडीस मान मिळाला असल्याचीही त्यांनी यावेळी सांगितले.
सरदार घराण्यांमधील २० स्वराज्यध्वजधारक ही होणार सहभागी…
छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थळ किल्ले पुरंदर ते वाघोली यादरम्यान पहिल्या दिवशीचा पालखी सोहळा सोमवारी (ता. २०) असणार आहे. हा प्रवास चारचाकी गाड्यांमधून केला जाणार आहे. मंगळवारी (ता. २१) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वाघोली ते तुळापूर हा पायी पालखी सोहळा होणार आहे. सरदार घराण्यांतर्फे छत्रपतींना मानवंदना देण्यासाठी २० घराण्यांचे स्वराज्यध्वज यामध्ये समाविष्ट असणार आहेत.
या सोहळ्याच्या अग्रभागी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा मानाचा ध्वज व अश्व असेल.
दरम्यान, सोमवारी सकाळी ८ वाजता किल्ले पुरंदरवर पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पादुकांवर अभिषेक होणार असून, २१ मार्च रोजी दुपारी १२ वाजता श्रीक्षेत्र तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची आरती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचेही संदीप भोंडवे यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी खटाव तालुक्यातील मुस्लिम ट्रस्टच्या कामाचे केले कौतुक