Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MLA Ashok Pawar : चासकमान जलप्रकल्पाच्या कामांसाठी सुमारे 1,950 कोटींची मंजूरी ; आमदार अशोक पवार यांची माहिती..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 23 December 2023, 16:00

रविंद्र पाटील 
शिक्रापूर, (पुणे) : गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या चासकमान जलप्रकल्पाच्या कामांसाठी सुमारे 1हजार950 कोटी रुपयांच्या सुप्रमाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने अखेर मंजूरी दिल्याची माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली. कालव्याच्या अस्तरीकरणासह, इतर कामे यामुळे मार्गी लागणार असून, सिंचन क्षमता अधिक प्रभावी होण्यास मदत मिळणार आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अशोक पवार यांनी चासकमान प्रकल्पाच्या सुप्रमाला मंजूरी देण्याविषयी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून आवाज उठवला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या दोन महिन्यात या सुप्रमाला मंजूरी देवू असे आश्वासन सभागृहाला दिले होते. तथापि नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सरकारने सादर केलेल्या पुरवणी बजेटमध्ये या प्रस्तावाला मंजूरी मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा प्रस्ताव पुन्हा रखडण्याची चिन्हे दिसत होती. मात्र आमदार पवार यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.या प्रस्तावाचे महत्त्व लक्षात घेता यावर सभागृहात चर्चा होण्याआधीच राज्य सरकारने विशेष बैठकीत निर्णय घेवून या सुप्रमाला मंजूरी दिली.

शिरूर आणि खेड तालुक्यासाठी वरदान असणाऱ्या चासकमान प्रकल्पामुळे, शिरूर तालुक्यातील सुमारे 44 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. धरणाच्या डाव्या कालव्यातून 930 क्यूसेक्स दाबाने पाणी सोडणे अपेक्षित असताना, कालव्याचा दर्जा लक्षात घेता 500 क्यूसेक्सने पाणी सोडले जाते. खेड आणि शिरूर तालुक्याच्या काही भागात कालव्यातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने पाणी पोहोचण्यास विलंब होतो. गळतीच्या भागात अति पाण्यामुळे तर कालव्याच्या शेवटच्या भागात कमी प्रमाणात पाणी पोहोचत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर दरवर्षी नुकसान होत असते.

 

त्यामुळे कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांनी 144 कि.मी. लांबीच्या कालव्याचे अस्तरीकरण, पोटचाऱ्यांची इतर कामे, त्याचबरोबर बंदिस्त पाईपद्वारे पाणी नेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. राज्य तांत्रिक सल्लागार समितीने या प्रस्तावाला मान्यता देवून सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला. वित्त आणि नियोजन समितीनेही या प्रस्तावाला मंजूरी देवून अंतिम मंजूरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला होता. ऑक्टोबर 2021 पासून प्रलंबित असणाऱ्या या प्रस्तावाला मंजूरी मिळावी यासाठी आमदार अशोक पवार तसेच जलसंपदा खात्याचे वरिष्ठ अधिकारी सातत्याने पाठपुरावा करत होते.

दरम्यान,  या प्रयत्नांना यश आले असून, राज्य सरकारने या सुप्रमाला मंजूरी दिली. मात्र त्यावर किती निधी टाकणार हे सांगितले नाही. सुमारे 1हजार 956 कोटी रुपयांचा हा प्रस्ताव असून, पहिल्या टप्प्यात किमान पाचशे कोटी रुपयांची तरतूद सरकारने करावी अशी आग्रही मागणी आमदार अशोक पवार यांनी केली आहे. या प्रस्तावातील संपूर्ण कामे पूर्ण झाल्यावर सिंचन क्षमता अधिक प्रभावी होण्याबरोबरच पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यास अधिक मदत मिळणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13

विकृतीचा कळस..! महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची बदनामी; दिग्दर्शक सचिन गोस्वामीं संतापले….

Friday, 3 July 2026, 18:09

जमिनीच्या वादातून फुरसुंगीत तुफान राडा; लोखंडी रॉड, काठीने हल्ला, तिघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा

Friday, 3 July 2026, 18:03

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45
Next Post
mumbai pune expressway traffic exit plan on weekend

सलग सुट्ट्यांमुळे पुणे- मुंबई महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होण्याची शक्यता; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केला हा आहे पर्याय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.