पुणे : राज्यात प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाने डुप्लिकेट वाहन परवान्याच्या शुल्कात वाढ केली आहे. एखाद्या व्यक्तीचा वाहन चालवण्याचा परवाना (लायसन्स) हरवला अथवा खराब झाला, तर त्याची दुसरी प्रत (डुप्लिकेट) काढण्यासाठी नागरिकांना आता जादा शुल्क द्यावे लागणार आहे.
आता डुप्लिकेट लायसन्स काढण्यासाठी नागरिकांना ६५० रुपये द्यावे लागणार आहेत. याबाबत परिवहन विभागाने नुकताच आदेश काढून या शुल्काची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आरटीओंना दिल्या आहेत.