सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
पुरंदर: पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणचे बार असोशियनच्या कार्यकारिणीची निवडणूक नुकतीच पार पडली. आत्तापर्यंत जेष्ट वकिलांच्या सल्ल्याने बिनविरोधपणे निवडणूक प्रक्रिया होत होती. मात्र यंदा प्रथमच मोठी चुरस पाहायला मिळाली. अध्यक्ष पदासाठी ऍडव्होकेट चंदन मेमाणे आणि ऍडव्होकेट बाबुराव पिलाने या दोघांनीही अर्ज दाखल केला. पिलाने यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बाद केल्यानंतर, चंदन मेमाणे यांना बिनविरोध निवडून आले.
मात्र चुकीच्या पद्धतीने अर्ज बाद केल्याचा आरोप करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात बाबुराव पिलाने यांनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. दरम्यान, बिनविरोध निवडून आलेल्या चंदन मेमाणे यांनी अध्यक्षपदाचा तडका फडकी राजीनामा दिल्याने, बारा असोसिएशनची निवडणूक चांगलीच गाजली आहे. बार असोसिएशनची कार्यकारणी अध्यक्ष ऍडव्होकेट चंदन मेमाणे, (राजीनामा) उपाध्यक्ष ऍडव्होकेट भारती शिंदे, सचिव एडवोकेट परेश इभाड, सहसचिव एडवोकेट अबरार बागवान, खजिनदार एडवोकेट मनोज तिवारी, हिशोब तपासणीस एडवोकेट पंकज बोरावके सासवड बार असोसिएशनच्या निवडणुकीत ऍडव्होकेट बाबुराव पिलाने यांचे पॅनलचा दणदणीत विजय झाला.
उपाध्यक्षपदी एडवोकेट भारती शिंदे यांचा तीन मतांनी विजय झाला. सचिव पदी एडवोकेट परेश शिवाजी इभाड दोन मतांनी विजयी झाले. दरम्यान, अध्यक्ष पदासाठी ऍडव्होकेट बाबुराव पिलाने आणि एडवोकेट चंदन मेमाणे च्या जोरदार नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. अध्यक्ष पदासाठी दोघांनीही अर्ज दाखल केल्या नंतर एडवोकेट चंदन मेमाणे यांनी बाबुराव पिलाने यांचा अर्ज बाद करावा, अशी निवडणूक अधिकारी एडवोकेट लक्ष्मण गायकवाड व दिगंबर पोमण यांच्याकडे मागणी केली, दोन्ही उमेदवारांचे लेखी युक्तिवाद आणि मान्यता ऐकून घेतल्यानंतर एडवोकेट बाबुराव पिलाने यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे एडवोकेट चंदन मेमाने बिनविरोध निवडून आले.
मात्र, मला चुकीच्या पद्धतीने बाद ठरविण्यात आल्याचा आरोप करून, निवडणूक अधिकारी एडवोकेट लक्ष्मण गायकवाड व दिगंबर पोमण यांच्या निकाला विरोधात एडवोकेट बाबुराव पिलाने यांनी थेट उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावर सुनावणी होणार असून, न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर पदग्रहण सोहळ्यात मावळते अध्यक्ष एडवोकेट अविनाश भारंबे यांनी नूतन अध्यक्ष चंदन मेमाणे यांच्याकडे अध्यक्ष पदाची सूत्रे सुपूर्त केली.