Chakan News : चाकण : व्यावसायिकाला एक कोटीची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या टोळीला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.
पाचजण अटकेत; दोघे फ़रार
शुभम उर्फ सोन्या विनोद काकडे, आकाश विनायक भुरे, शुभम युवराज सरवदे, अजय नंदू होले, नवनाथ शांताराम बच्छे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Chakan News) तर दोन आरोपींचा पोलीस शोध पोलीस आहेत. याप्रकरणी संजय धुलाप्पा कुरुंदवाडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय कुरुंदवाडे हे आळंदी फाटा येथील वर्कशॉपमधून एकता नगरच्या दिशेने निघाले. त्यांना पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी अडवली. आणि माझ्या गाडीला धडक दिली असं म्हणत अरेरावी केली. माझी गाडी दुरुस्त करून द्या, असं म्हणत त्यांना बळजबरीने रिक्षात बसवले. (Chakan News)
टोळीने कुरुंदवाडे यांना खेड परिसरातील पाईट या ठिकाणी निर्जनस्थळी नेले. व तू व्यवसायिक आहेस तू आम्हाला एक कोटी दे, तसं न केल्यास आम्ही तुझ्या घरच्यांचा गेम करू असं म्हणत धारदार शस्त्र दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, दुसऱ्याच दिवशी ठरल्याप्रमाणे बारा लाख रुपयांची सोय केली का? म्हणून आरोपींचा फोन आला. यामुळे ते आणखी घाबरले. शिवाय, आरोपी हे वेगवेगळ्या नंबर वरून फोन करत होते. खंडणीसाठी वारंवार येत असलेल्या फोनमुळे संजय हे देखील त्रस्त झाले होते. (Chakan News) अखेर ही बाब नातेवाईक आणि मित्रांना सांगितल्यानंतर त्यांनी चाकण पोलिसात तक्रार द्यायची ठरवली. त्यानंतर कुरुंदवाडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यानंतर आरोपींचा कुरुंदवाडे यांना खंडणीसाठी फोन आला. आणि संबंधित रक्कम ही नाणेकरवाडी या ठिकाणी असलेल्या एटीएमच्या शेजारी कचऱ्याच्या डब्यात पैशाची बॅग ठेवण्यास सांगितली. (Chakan News) त्यानंतर चाकण पोलिसांनी सापळा रचून पैसे घेण्यास आलेल्या ५ आरोपीला बेड्या ठोकल्या. तर आरोपी जण फरार असून चाकण पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Chakan News : चाकण येथे शिवशाही बसला आग ; जीवितहानी नाही, बसचे मोठे नुकसान..
Chakan News : 196 गुंठे जमीन परस्पर विकत व्यावसायीकाची तब्बल अडीच कोटींची फसवणूक